गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह यंदा होणार व्हर्च्युअल

सतीश वैजापूरकर
Friday, 17 July 2020

या सप्ताहाची राज्यात ख्याती आहे. सर्वसामान्य भाविकांपासून ते थेट मंत्र्यांपर्यंत या सप्ताहात सहभागी होतात. यंदा तो व्हर्च्युअल पद्धतीेन होणार आहे.
 

शिर्डी ः सराला बेट येथे नियोजित सद्‌गुरू गंगागीर महाराज यांच्या हरिनाम सप्ताहाचा नारळ आज पुणतांबे येथे महंत रामगिरी महाराजांनी परंपरेनुसार संयोजकांच्या स्वाधीन केला.

वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, कडूभाऊ काळे, बाळासाहेब कापसे, कमलाकर कोते व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा नारळ स्वीकारला. येत्या 24 ते 31 जुलैदरम्यान व्हर्च्युअल पद्धतीने सराला बेट येथे सप्ताह होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

महंत रामगिरी महाराज म्हणाले, की प्रथेप्रमाणे कामिका एकादशीनिमित्त पुणतांबे तीर्थक्षेत्री सप्ताहाचा नारळ देण्याचा कार्यक्रम झाला.

हेही वाचा - खासगीवाले म्हणाले निगेटिव्ह, सरकारीत आला पॉझिटिव्ह

कोरोनाच्या संकटामुळे शिरसगाव येथील सप्ताह रद्द करून, तो 172 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सराला बेटावर आयोजित करण्यात येणार आहे. भाविकांनी घरात बसून सोशल मीडियातून सहभागी व्हायचे आहे.

सप्ताहात भाविकांना बेटावर येता येणार नाही. सरपंच डॉ. धनंजय धनवटे, बाबासाहेब चिडे, बाबासाहेब जाधव, संदीप पारख, संतोष जाधव, दिनकर भोरकडे व विजय धनवटे आदी उपस्थित होते.

या सप्ताहाची राज्यात ख्याती आहे. सर्वसामान्य भाविकांपासून ते थेट मंत्र्यांपर्यंत या सप्ताहात सहभागी होतात. नगर, अौरंगाबाद, बीड, नाशिक जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या सप्ताहात दररोज लाखो भाविक प्रसाद घेतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सहभागी होण्यासाठी योगदान देत असतो.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangagiri Maharaj's Harinam week will be virtual this year