
Ahilyanagar Crime
पारनेर: सुपे पोलिसांनी तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारात छापा टाकून ११२ किलो वजनाचा सुमारे ११ लाख २० हजार रुपये किंमतीचा गांजा हस्तगत केला आहे. या प्रकरणी शहाजापूर येथील शेतकरी भाऊसाहेब सोनबा शिंदे याच्या विरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच सुमारे एक हजार किलो गांजा नष्ट केला आहे.