Karanji : गर्भागिरी डोंगरावर आगडोंब, आष्टी व करंजी वन क्षेत्र जळून खाक

आष्टी व पाथर्डीच्या सीमेवर असलेल्या गर्भागिरी डोंगराला करंजी घाटावर आष्टी वन विभागाअंतर्गत येत असलेल्या जंगलाला बुधवारी (ता. १०) दुपारी एक वाजता मोठी आग लागली. या आगीत ७० ते ८० हेक्टर जंगल जळून खाक झाले असून, यामुळे मोठी हानी झाली आहे.
Karanji News
Karanji NewsSakal

Karanji : आष्टी व पाथर्डीच्या सीमेवर असलेल्या गर्भागिरी डोंगराला करंजी घाटावर आष्टी वन विभागाअंतर्गत येत असलेल्या जंगलाला बुधवारी (ता. १०) दुपारी एक वाजता मोठी आग लागली. या आगीत ७० ते ८० हेक्टर जंगल जळून खाक झाले असून, यामुळे मोठी हानी झाली आहे.

देऊळगाव घाट, हारेवाडी, मराठवाडी येथील शेतकरी शेतातील बांधबंदीस्ती करण्यासाठी शेतकरी गवत जळतात. ही आग अचानक जंगलाकडे जाते. त्यामुळे अनेक वेळा जंगलाला आग लागते.

असाच काहीसा प्रकार बुधवारी घडला व जंगलाला आग लागली. एक वाजेच्या दरम्यान ही आग करंजी डोंगराला लागली होती. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिसगाव वनक्षेत्राचे दोन कर्मचारी आग विझवण्यासाठी येथे पोहोचले होते; मात्र वारा आणि रात्र असल्यामुळे त्यांना रात्री उशिरापर्यंत ही आग विझली नाही.

वन विभागाला कळवल्यानंतर ते जंगलात आले असते, तर बराच भाग आगीपासून वाचवता आला असता, असे करंजी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

प्रचंड उन्हाळा आणि पिण्यास पाणीही नसल्याकारणाने अनेक पशुपक्षी गवत, झाडांचा आसरा घेतात; मात्र लागलेल्या वणव्यामुळे वन्य प्राणी जळून खाक होत असून, याबाबत वन विभागाने किमान एप्रिल, मे महिन्यात तरी काळजी घेणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते छानराज शेतकरी यांनी सांगितले.

Karanji News
Fire News: अहमदपूरमध्ये अकरा दुकाने जळून खाक, अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान

‘आमची हद्द नाही’

डोंगराच्या खालील बाजूस करंजी (ता. पाथर्डी) तिसगाव वनपरीक्षेत्राअंतर्गत असलेल्या जंगलाकडेही आग लागली. अनेक वेळा असे प्रकार घडलेले आहेत.

आज लागलेली आग निश्‍चित इकडे येणार म्हणून करंजी ग्रामस्थांनी तिसगाव वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना फोन केला, तो भाग आमच्या हद्दीत येत नाही, जर ही आग तिसगाव क्षेत्राच्या हद्दीत (करंजी) खाली आल्यास आम्हाला कळवा; मग आम्ही येऊ, असे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले.

गेल्या दोन वर्षांपासून वन विभाग जाळ रेषा मारत नाही. त्यामुळे लागलेली आग आटोक्यात येत नाहीत. त्यामुळे अनेक हेक्टर क्षेत्र जळून खाक होते.

- उत्तम अकोलकर, शेतकरी, करंजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com