

Gauri Palve Funeral Held Outside Anant Garje’s Home
Esakal
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीनं गळफास घेत आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अनंत गर्जे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. गौरीचा छळ केल्याचा आणि तिची हत्या केल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केलाय. तिच्या मृतदेहावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले. अहिल्यानगरमधील मोहोज देवढे या मूळगावी गौरी पालवे गर्जे यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी नातेवाईकांनी अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्काराची भूमिका घेतली. यावरून पालवे कुटुंब आणि गर्जे यांच्यात वादही झाला. पण पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.