Akole News : घोडेगाव, राजूरला अपर तहसीलदार कार्यालय; सोनई, चांदे, वडाळा, देडगाव मंडलांचा समावेश

Ghodegaon Office to Cover Five Revenue Circles : नेवासे तालुक्यातील घोडेगाव आणि अकोले तालुक्यातील राजूर येथे अपर तहसीलदार कार्यालयांना शासनाने मंजुरी दिली आहे.
Akole News

Akole News

esakal

Updated on

सोनई : राज्यपाल यांच्या आदेशानुसार सरकारच्या कार्यासन अधिकारी राणी देवकते यांनी नेवासे तालुक्यातील घोडेगावात अपर तहसीलदार कार्यालय तातडीने करण्यास मंजुरी दिली आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथीही अपर तहसीलदार कार्यालय मंजूर झाले आहे.

घोडेगावबरोबर अकोले तालुक्यातील राजूर येथेही अपर तहसीलदार कार्यालय मंजूर करताना शासनाने त्या-त्या तालुक्यातील मंडलाची विभागणी करून तात्पुरते कार्यालय तातडीने सुरू करण्याचे आदेशात नमूद केले आहे. शासन निर्णय जाहीर होताच घोडेगाव ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. कार्यालयीन कामकाजाचा वाढता व्याप व उपलब्ध अपुरी अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या, तसेच भौगोलिक स्थान आणि वाढती लोकसंख्या विचारात घेऊन प्रशासनाचे कामकाज लोकाभिमुख होण्यासाठी जिल्ह्यातील दोन गावांत अपर तहसीलदार कार्यालय मंजूर करण्यात आले.

Akole News
Nagpur DJ Ban : डीजेच्या मनमानीला आता डीसीपी-एसीपीही जबाबदार; नागपूर खंडपीठाचे पोलिस आयुक्तांना नव्याने अधिसूचनेचे निर्देश

कार्यालय मंजूर करताना पदांनाही शासनाने मंजुरी दिली आहे. अपर कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कायद्यान्वये नेमून दिलेल्या क्षेत्रासाठी असेल. निवडणूक, संजय गांधी निराधार योजना करता आलेले अर्ज, निवेदन मुख्य तहसील कार्यालयास सादर करायचे आहेत. घोडेगाव अपर तहसील कार्यालयाचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी व त्यास नियंत्रक म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतील, असे शासन आदेशात नमूद केले आहे.

घोडेगाव व राजूर येथे तातडीने तात्पुरते कार्यालय सुरू करून नवीन कार्यालय बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले आहे. हा शासन निर्णय मंगळवारी (ता. २२) रोजी प्रसिद्ध झाला आहे. घोडेगाव अपर तहसील कार्यालयासंदर्भात राज्यपालांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव, उपमुख्यमंत्री नगरविकास विभाग सचिव व अन्य २२ शासकीय विभागांना आदेशाची प्रत देऊन सूचित करण्यात आले आहे.

Akole News
Compassionate Appointment : सुनेच्या पगारातील २५ टक्के रक्कम सासुला द्यावी लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?

मंडलांची विभागणी नेवासे तहसील कार्यालय ः नेवासे खुर्द, नेवासे बुद्रुक, सलाबतपूर, कुकाणे, प्रवरासंगम व भानस हिवरे. घोडेगाव अपर तहसील कार्यालय ः सोनई, चांदे, घोडेगाव, वडाळा व देडगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com