जिल्हा बँकेत घुले, म्हस्के बिनविरोध, २१ जागांसाठी ३१२ उमेदवारी अर्ज

मुरलीधर कराळे
Monday, 25 January 2021

11 फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची तारीख असून, बुधवारी (ता. 27) अर्जाची छाणणी होईल. घुले व म्हस्के यांचे अर्ज वैध ठरल्यानंतर ते बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट होईल. 
 

नगर ः नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आज (सोमवारी) शेवटच्या दिवशी एकूण 21 जागांसाठी 312 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

शेवगाव सोसायची मतदार संघातून साखर संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले व राहाता सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री अण्णासाहेब मस्के यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.

11 फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची तारीख असून, बुधवारी (ता. 27) अर्जाची छाणणी होईल. घुले व म्हस्के यांचे अर्ज वैध ठरल्यानंतर ते बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट होईल. 
आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नेत्यांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशेजारील निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी होती.

हेही वाचा -महाविकास आघाडीसाठी शरद पवार यांनी टाकले फासे

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, नीलेश लंके, संग्राम जगताप, मोनिका राजळे, अशुतोष काळे, माजीमंत्री शिवाजी कर्डिले, विद्यमान अध्यक्ष सीताराम गायकर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार, माजी आमदार जयंत ससाणे यांचे चिरंजीव करण ससाणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे, राहुल जगताप, पांडुरंग अभंग, वैभव पिचड, अण्णासाहेब मस्के, सभापती क्षितीज घुले, चेतन सदाशीव लोखंडे, जयश्री विजय औटी, अनुराधा नागवडे, प्रशांत गायकवाड, भगवानराव पाचपुते, सबाजीराव गायकवाड, राजेश परजणे, अरुण तनपुरे, सुभाष पाटील, उदय शेळके, विवेक कोल्हे, अंबादास पिसाळ, शेतकरी नेते दशरथ सावंत, जगन्नाथ राळेभात आदींनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. उद्या (बुधवारी) दाखल अर्जाची छाननी होणार आहे. 

असे झाले अर्ज दाखल 

अकोले ः 6, जामखेड ः 9, कोपरगाव ः 6, कर्जत ः 10, कोपरगाव 6, नगर ः 7, नेवासे ः 9, पारनेर ः 12, पाथर्डी ः 6, राहाता ः 4, राहुरी ः 11, संगमनेर ः 6, शेवगाव ः 3, श्रीगोंदे ः 9, श्रीरामपूर ः 9, सोसायटी 107, शेतीपुरक मतदारसंघ ः 36, बिगरशेती मतदार संघ ः 50, महिला राखीव मतदारसंघ ः 43, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ ः 12, इतर मागासवर्ग मतदार संघ ः 46, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती मतदारसंघ ः 18. एकूण 312. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghule in District Bank, Mhaske unopposed, 312 candidature applications for 21 seats