esakal | कान्हूर पठारात सोन्याच्या दागिन्यांची चोरी

बोलून बातमी शोधा

Gold jewelery has been stolen from Kanhur Plateau in Parner taluka

याबाबत पोलिसांना माहिती कळल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली.  घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.

कान्हूर पठारात सोन्याच्या दागिन्यांची चोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे रात्रीच्या वेळी घराच्या पहिल्या मजल्यावरील बंद दरवाजा उघडून अज्ञातांनी घरामध्ये असणाऱ्या सोन्याच्या दागिन्याची जवळपास पाच लाख 35 हजार रुपयांची जबरी चोरी केली आहे. याबाबत पारनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तुषार गंगाधर ठुबे (वय 27) रा. गारगुंडी रोड कान्हूर पठार ता. पारनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गारगुंडी रोड कान्हूर पठार येथे असणाऱ्या घराच्या वरच्या मजल्यावरील दरवाजामधूूून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटांमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिन्यामध्ये 1 लाख 80 हजार रुपये दहा तोळे सोन्याचे मंगळसूत्र, 1 लाख 20 हजार रु. किंमतीचे चार तोळे सोन्याचे राणी हार, 60 हजार किंमतीचे दोन तोळे वजनाच्या सोन्याचा  नेकलेस, 30 हजार किंमतीचे एक तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, 25 हजार रुपये किंमतीचा कानातील एक तोळे वजनाचे सोन्याचे झुबे, 25 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 25 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, 20 हजार किंमतीच्या सोन्याचे 50 हजार किंमतीच्या विविध चलनी नोटा असा एकूण 5 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरांनी चोरून नेला आहे. 

हे ही वाचा : शिक्षकांच्या चाचणीनंतरच आठवीपर्यंतचे वर्ग भरणार

याबाबत पोलिसांना माहिती कळल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली.  घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच फिंगर प्रिंट घेण्यात आले असून याबाबत तपास सुरू आहे. याबाबत पारनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप करत आहेत