

Onion Market Turns Positive; Farmers Hope for Better Returns
sakal
अहिल्यानगर: जुलै ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसाने कांद्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झालेला असून, कांद्याच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे सध्या बाजारात लाल कांद्याची कमी आवक होत आहे, तसेच साठवून ठेवलेला लाल कांद्यालाही पावसाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे गावरान कांदा मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे. त्यामुळे कांद्याची आवक कमी झालेली आहे. त्यातच परराज्यासह बांगलादेशातून कांद्याला मागणी वाढल्याने भावात तेजी आलेली आहे.