Good News : फळबागेवर "फुले रोबो" करील फवारणी तु्म्ही फक्त आराम करायचा

Good News: Farmers will spray "Flower Robot" on the orchard
Good News: Farmers will spray "Flower Robot" on the orchard

राहुरी विद्यापीठ : केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालय आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, पुसा, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ॲग्री इंडिया हॅकॅथॉन २०२० आयोजन केले होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे सदस्य डॉ. सचिन नलावडे यांनी सादर केलेल्या फुले रोबो काटेकोर पीक संरक्षणासाठी रिमोट संचलित छोटेखानी स्वयंचलित यंत्राला एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्याचबरोबर, राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत इन्क्युबेशन, तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करणे व त्यामध्ये योग्य त्या सुधारणा करण्यासाठी ५ ते २५ लाखांचे अनुदान मिळवण्यासाठी पात्र ठरला आहे.

पाच प्रमुख संकल्पनांच्या आधारे संपूर्ण भारतातून अर्ज मागविण्यात आले होते. ॲग्री इंडिया मीट या संकल्पनेतून विविध विषय तज्ञांचे ऑनलाईन व्याख्यान व संभाषण स्पर्धकांना आकर्षित करण्यासाठी आयोजन करण्यात आले होते. हॅकॅथॉनसाठीे ६००० पेक्षा जास्त प्रकल्पांंनी सहभाग नोंदविला होता. यातील ३०० प्रकल्पांची निवड पुढील टप्यांसाठी करण्यात आली. ’फुले रोबो’, रोबोटीक हावेस्टर आणि व्हेरीयबल रेट फल्टीराझल ॲप्लिकेटर या तीन प्रकल्पांची पुढील टप्पासाठी निवड झाली.

या टप्प्यामध्ये ऑनलाईन सादरीकरण तीन दिवस घेण्यात आले. यामध्ये तीन तज्ञांनी स्पर्धकांना व्यावसायिक मार्गदर्शन तसेच त्यांचे मुल्यामापन केले. ३०० प्रकल्पांपैकी ६० प्रकल्पांची महा अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. ’फुले रोबो’ हा प्रकल्प पहिल्या ६० प्रकल्पांमधे महा अंतिम फेरीसाठी निवडला गेला.
महा अंतिम फेरीची स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. निवडलेल्या ६० स्पर्धकांनी ऑनलाईन सादरीकरण केले. तंत्रज्ञानाची व नाविन्याची गरज, योग्यता, उपयोगिता, बाजारातील त्याची गरज या सर्व बाबींवर तज्ञांनी स्पर्धकांना प्रश्न विचारुन सखोल विश्लेषण आणि परिक्षण केले. 

स्प्रेयींग रोवर विकसीत करण्यासाठी कास्ट प्रकल्पाचे फुले रोबो या प्रकल्पाचे प्रमुख डॉ सचिन नलावडे, सहयोगी संशोधक डॉ. गिरिषकुमार भणगे, इंजि. योगेश दिघे, इंजि. श्रद्धा वराळे तसेच अजित खर्जूल व त्यांच्या टिमने विशेष मेहनत घेतली. फुले रोबो प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, सह-प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, खरेदी अधिकारी डॉ. अतुल अत्रे यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधक संचालक डॉ.शरद गडाख यांचे मार्गदर्शन लाभले.

असा आहे "फुले रोबो"

"फुले रोबो’ हा फळबागेसाठी विकसीत करण्यात आला आहे. फुले रोबो’ हा बॅटरीवर चालणारा, मनुष्यविरहीत आहे. तो रिमोट कंट्रोलरच्या सहाय्याने चालविला जातो. तसेच उतारावर तसेच चिखलात चांगल्या प्रकारे पकड मिळवण्यासाठी रबरी ट्रॅकचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर रोवरला चालवण्यासाठी बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. त्याचे अंदाजे वजन १५० किलो असून त्यामध्ये ७० लिटर द्रावणाचा समावेश आहे. यामध्ये सध्या सेन्ट्रीफ्युगल नोझलचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे उत्तम प्रकारची फवारणी केली जाते. या रोवरच्या सहाय्याने वेळेची व शक्तीची बचत होणार आहे. तो चालविणाऱ्या मनुष्याचा हानिकारक रसायनाच्या पासून बचाव होतो. त्याचबरोबर किटकनाशकांची बचत होते. कमी वजनामुळे जमिनीचे कॉम्पॅक्शन होत नाही. शेतकऱ्यासाठी येणाऱ्या काळात वरदान ठरेल.आकाशमार्गाने पिकावर फवारणी होईल. सध्या तो विक्रीला नाही. लवकरच त्याची नोंदणी करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com