विखे पाटील म्हणाले, भारत बंदला विरोध करा पण लोकांनी ऐकलंच नाही

सतीश वैजापूरकर
Tuesday, 8 December 2020

बाजार समितीतील व्यवहार सुरू होते. भाजीपाल्याच्या मोंढ्यावर चार लाखांची उलाढाल झाली. अन्य शेतमालाची आवक मात्र रोडावली होती. मोंढ्यावर 800 क्विंटल कांदा, तर 50 क्विंटल धान्याचे लिलाव सुरळीत झाले.

राहाता ः आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारत बंदला विरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र, राहाता तालुक्यात तसे घडले नाही. महाविकास आघाडी व शेतकरी संघटनांच्या आवाहनास प्रतिसाद देत, शहरात आज दुपारी बारा वाजेपर्यंत कडकडीत "बंद' पाळण्यात आला. हा शेतकरी हितासाठी बंद असला तरी राजकीय दृष्टीने त्याकडे पाहिले जात होते.

तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आले. बाजार समितीतील व्यवहार सुरू होते. शिर्डीतही "बंद'चा परिणाम जाणवला नाही.

बाजारतळावर महाविकास आघाडी व शेतकरी संघटनेतर्फे सभा झाली. शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, रावसाहेब बोठे, मोहन सदाफळ, शशिकांत लोळगे, लता डांगे, सुधीर म्हस्के, भगवान टिळेकर, राजेंद्र बावके, एल. एम. डांगे आदी उपस्थित होते.

बाजार समितीतील व्यवहार सुरू होते. भाजीपाल्याच्या मोंढ्यावर चार लाखांची उलाढाल झाली. अन्य शेतमालाची आवक मात्र रोडावली होती. मोंढ्यावर 800 क्विंटल कांदा, तर 50 क्विंटल धान्याचे लिलाव सुरळीत झाले.

राहाता बाजार समितीवर विखे पाटील यांचे वर्चस्व आहे. भाजप समर्थकांनी सोशल मीडियावर "बंद'मध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले होते. मात्र, येथे दुपारपर्यंत कडकडीत "बंद' पाळला गेल्याने, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good response in Rahata taluka to Bharat Bandh Andolan