माळवाडगाव येथे शासकीय हरभरा खरेदी केंद्रास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 February 2021

नोंदणीसाठी बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्डसह, हरभरा पिकाची नोंद असलेला सातबारा तसेच मोबाईल क्रमाकांची आवश्यकता आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील माळवाडगाव येथे नाफेड अंतर्गत शासकीय हरभरा खरेदी केंद्रास नुकताच प्रारंभ झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करण्याचे आवाहन ग्रीनपॅक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे संचालक प्रमोद आसने यांनी केले आहे.

खुल्या व्यायामशाळा साहित्य योजनेला शासनाची मंजुरी 

नाफेड अंतर्गत महा-एपीसी पुणे व ग्रीनपॅक फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आधारभूत किंमतीत हरभरा खरेदी विनाकपात प्रती क्विटल पाच हजार 100 रुपये प्रमाणे होत असून शेतकऱ्यांनी नोंदणी करुन आपला हरभरा खरेदी केंद्रावर द्यावा. नोंदणीसाठी बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्डसह, हरभरा पिकाची नोंद असलेला सातबारा तसेच मोबाईल क्रमाकांची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने नाव नोंदणी करुन शासकीय आधारभूत किंमतीचा फायदा घ्यावा. तसेच नोंदणीसाठी कागदपत्रे माळवाडगाव येथील कंपनीच्या कार्यालयात जमा करावी. नोंदणीसाठी पुढील 9511255712, 9226430020 क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Government Gram Shopping Center at Malwadgaon has just started