esakal | खुल्या व्यामशाळा साहित्य योजनेला शासनाची मंजुरी

बोलून बातमी शोधा

The open gymnasium material scheme has been approved by the government.jpg}

परहर म्हणाले की, राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी जिल्हास्तरीय विविध योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. ही योजना जिल्हा परिषदेमार्फत अंमलात आणली जात आहे.

ahmednagar
खुल्या व्यामशाळा साहित्य योजनेला शासनाची मंजुरी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे. या योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून खुल्या व्यायाम शाळा साहित्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी दिली.

केबल अंगावर पडून शिर्डीत महिलेचा मृत्यू 
 
परहर म्हणाले की, राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी जिल्हास्तरीय विविध योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. ही योजना जिल्हा परिषदेमार्फत अंमलात आणली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे, मलनिःस्सारण, वीज, गटा बांधणे, अंतर्गत रस्ते, पोहच रस्ते, समाजमंदिराचे बांधकाम आदी विकास कामांचा समावेश आहे. त्यामध्ये खुली व्यामशाळा या कामाचा समावेश नव्हता. तो व्हावा, यासाठी आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरवा केला. त्यांनी नगर जिल्ह्याकरिता विशेष बाब म्हणून खुली व्यायाम शाळा साहित्य या कामाचा समावेश करण्यात येऊन मान्यता व निधीची तरतूद केलेली आहे. 

परहर म्हणाले की, या योजनेमुंळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये खुली व्यायामशाळा साहित्य देणार आहे. समाजातील मुला-मुलींना व तसेच महिलांना याचा शारिरीक तंदुरुस्तीसाठी फायदा होणार आहे. या योजनांचे प्रस्ताव गटविकास अधिकारी, पंचायत समितीकडून तातडीने मागविण्यात आलेले आहे. ही योजना लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याचा लाभ होण्यासाठी या योजनेचा निधी खर्च होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे ते म्हणाले.