

Emotional scenes in Shirdi as government gifts plots to 350 families
Sakal
शिर्डी: वर्षानुवर्षे निवारा देणारी अतिक्रमणातील सुमारे साडेतीनशे घरे ध्यानीमनी नसताना पाडण्याची वेळ आली. जेथे दोन-तीन पिढ्या लहानच्या मोठ्या झाल्या. त्या विस्थापितांच्या पायाखालची जमीन सरकली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सहा महिने थांबा, हक्काच्या जमिनीवर हक्काचा निवारा देऊ, असे आश्वासन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.