esakal | एकाच वेळी दोन नोकऱ्या करून लाटले सरकारी मानधन; डॉक्टरविरोधात गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Salary fraud

दोन नोकऱ्या करत लाटले सरकारी मानधन; डॉक्टरविरोधात गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

पारनेर (जि. अहमदनगर) : जुन्नर तालुक्यात पिंपळवंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदावर काम करीत असताना अळकुटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वडझिरे उपकेंद्रातही समुदाय अधिकारी म्हणून काम केल्याचे दाखवून, दोन्ही ठिकाणाचे मानधन घेतले. दोन्ही ठिकाणी मानधन घेऊन सरकारची फसवणूक केल्याने डॉ. तेजश्री ढवळे (रा. जवळा) यांच्या विरोधात डॉ. संदीप देठे यांनी फिर्याद दिली.

एकाच वेळी दोन ठिकाणी काम केल्याचे दाखविले

डॉ. ढवळे यांनी तीन ते ३० जून २०२१ दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळवंडी व एक ते ३० जून २०२१ दरम्यान वडझिरे उपकेंद्र येथे एकाच वेळी दोन ठिकाणी काम केल्याचे दाखविले. त्यांनी पिंपळवंडी येथे हे काम केल्याचे दाखवत सरकारकडून ४० हजार रुपये मानधन व अळकुटीअंतर्गत वडझिरे उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून काम केल्याचे दाखवत ३३ हजार रुपये मानधन घेतले.

हेही वाचा: Ahmednagar : काउंट डाऊन... प्रतीक्षा संपतेय!

याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात डॉ. ढवळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. ढवळे यांनी एकाच वेळी दोन ठिकाणी सरकारी नोकरी करून, दोन्ही ठिकाणी मानधन घेऊन सरकारची फसवणूक केली आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. १२) पारनेर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत डॉ. संदीप देठे (वय २८, रा. बहिरोबाची वाडी, किन्ही, ता. पारनेर) यांनी दिली. डॉ. ढवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: राजू शेट्टी म्हणाले भाजप-महाआघाडी म्हणजे, 'चोर-चोर मावसभाऊ..'

loading image
go to top