कोरोनाने वडिलांचे निधन झाल्यानंतरही केलेल्या कार्याची राज्यपालांकडून दखल

मार्तंड बुचुडे
Tuesday, 15 December 2020

प्रमोद दुगड यांना 2020 चा भारत लिडरशिप पुरस्कर नुकताच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

पारनेर (अहमदनगर) : पुणे शहरासह परिसरात कोरोनाच्या संकटकाळात केलेल्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन द लेक्सीकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिटूटतर्फे दुगड ग्रुपचे प्रमुख प्रमोद दुगड यांना 2020 चा भारत लिडरशिप पुरस्कर नुकताच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

पुणे व परीसरात कोरोनाच्या संकटकाळात दुगड परिवारने कामगार, परराज्याती मजूर तसेच पोलिस, सरकारी नौकरवर्ग, वैद्यकिय सेवा देणारे तसेच सामाजिक काम करणाऱ्या नागरीकांना मोफत सॅनिटझर तसेच मास्कचे वाटप केले. त्याचबरोबर अनेकांना या काळात अन्नदान केले. घरपोहच डबेही देण्याचे काम केले. या काळातच दुगड ग्रुपचे संस्थापक माणिकचंद दुगड यांचे कोरोनानेच निधन झाले. मात्र वडिलांचे निधन झाले असतानाही त्या दुः खातून सावरत वडिलांनी केलेल्या सामाजिक, धार्मिक कामाचा व गोधन सेवेचा वसा तसाच पुढे सुरू ठेवला आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या कार्याची दखल घेत या वर्षीचा द लेक्सीकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिटूटच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा भारत लिडरशीप पुरस्कार दुगड ग्रुपचे प्रमुख प्रमोद दुगड यांना राज्यपाल कोशारी यांचे हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. 
वडिलांनी दिलेली मानवसेवा व गोसेवेचेव्रत दुगड परिवाराने तसेच कायम ठेवले. हा पुरस्कर मी माझे वडिल आदरणिय माणिकचंद दुगड यांना नम्रपणे अर्पण करतो, असेही यावेळी दुगड यांनी सांगीतले.

यापुढेही त्यांचे समाजसेवेचे व गोधन सेवेचे कार्य असेच सुरू राहील असेही ते म्हणाले. या पुरस्कारबद्दल जैन समाज संघटणेतून दुगड परीवाराचे कौतुक होत आहे. या वेळी एस.डी शर्मा, पंकज शर्मा नीरज शर्मा व नाशीर शेख आदी मान्यवर उपस्तीत होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor presents award to Dugad group in Parner taluka