
पारनेर : तालुक्यात बोगस, विनापरवाना, तसेच जादा दराने खते, बियाणे व औषधे विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची, तसेच तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांना बोगस, जादा दराने बियाणे खते, तसेच औषधे यांची विक्री करू नये; अन्यथा त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.