

Flood victims waiting for government relief; CM’s free grain promise yet to reach the ground.
Sakal
-गोरक्षनाथ बांदल
अहिल्यानगर: मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीने २३ किलो मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. तथापि, त्याबाबत प्रशासकीय पातळीवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पूर ओसरला, तरीही धान्य त्यांच्या घरापर्यंत पोचले नाही. त्यामुळे ही घोषणा ‘फुसकी’ असल्याची भावना लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.