esakal | पाण्यात बुडून नातीसह आजीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

पा्ण्यात बुडून मृत्यू

पाण्यात बुडून नातीसह आजीचा मृत्यू

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः तालुक्‍यातील चिंचोली गुरव शिवारातील जाधववस्ती येथे शेळ्या चारण्यासाठी रानात गेलेल्या आजी-नातींचा डबक्‍यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 30) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. भक्ती नीलेश आभाळे (वय 7) व प्रमिला श्रीराम आभाळे (वय 47) अशी त्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, या आजी-नाती नेहमीप्रमाणे शेळ्या व गायी घेवून चारण्यासाठी जाधववस्ती परिसरातील ओढ्यातील बंधाऱ्याजवळ गेल्या होत्या. या परिसरात रस्ता कामासाठी ओढ्यातील मुरुम काढल्याने तयार झालेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. अनावधानाने भक्तीचा पाय घसरुन ती डबक्‍यात पडली.

हेही वाचा: मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे "मिशन वायू"

आजी प्रमिला यांना तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याही डबक्‍यात पडल्या. दरम्यान, शेतात जनावरे घुसल्याने मनोज जाधव यांनी आजी-नातींचा शोध घेतला. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या घरी जावून दोघी गुरांमागे नसल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांचा शोध घेताना डबक्‍याजवळ चपला आढळल्याने अघटीताची शंका आली.

मनोज जाधव, प्रकाश आभाळे, समाधान सांगळे यांनी परिसरातील अट्टल पोहणाऱ्यांच्या मदतीने दोघींना बाहेर काढले. त्यांना प्रथन तळेगाव दिघे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या बाबत संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

loading image