esakal | मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे "मिशन वायू"

बोलून बातमी शोधा

Oxygen

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे "मिशन वायू"

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर ः मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स संस्थेने "मिशन वायू' हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑक्‍सिजन प्लॅंट व व्हेंटिलेटर दिले जाणार आहेत. नगर जिल्ह्यातील उद्योजकांकडून येणारी मदत ही येथील आरोग्यसेवेसाठी वापरली जाणार असल्याची माहिती मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली.

हेही वाचा: अदर पुनावालांची सुरक्षा वाढवली, धमक्या देणाऱ्यांवर कारवाई

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर (एमसीसीआयए) हे पुण्यातील 87 वर्षांचे चेंबर ऑफ कॉमर्स असून, 3000 हून अधिक कॉर्पोरेट सदस्य आहेत. कोरोना काळात एमसीसीआयएने महाराष्ट्रातील आरोग्य सेवा क्षेत्रातील मागणी आणि पुरवठ्यातील संभाव्य पोकळी भरून काढण्यासाठी एक व्यासपीठ करण्याची कल्पना केली. यामुळे पीपीसीआर (पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स) तयार करण्यात आला. गेल्या वर्षात, पीपीसीआरने 300 हून अधिक व्हेंटिलेटर, 130 एचएफएनओ, 600 बेड कोविड केअर सेंटर आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

कोरोनाच्या वाढीमुळे ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरची मागणी वाढली आहे. पीपीसीआरने मिशन वायू सुरू केले असून त्याद्वारे महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या भागातील ऑक्‍सिजन केंद्रे व बीआयपीएपींची देणगी देण्याची व्यवस्था केली जात आहे.

राज्यातील आठ जिल्ह्यांतील लोकांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून, पीपीसीआरने आता लोकांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यात दान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी राज्यातील वैयक्तिक जिल्ह्यांसाठी मोहीम सुरू केली आहे.