आजोबाच निघाला नातवाचा मारेकरी, मामा ठरला कंसमामा...मृतदेहाचे केले नऊ तुकडे

The grandfather killed his grandson
The grandfather killed his grandson

नगर : नातू दारू पिण्यासाठी सतत पैसे मागत असल्याने आजोबाशी वाद झाला. त्या वादातून आजोबाने कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आजोबा व मामाला अटक केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. कमलाकर हनुमंत डगळे (वय 70, रा. खिरविरे, ता. अकोले), हरिश्‍चंद्र कमलाकर डगळे (वय 35, रा. खिरविरे, हल्ली रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

 चिंचोडी (ता. अकोले) शिवारात 2 जुलै रोजी कृष्णावंती नदीवरील पुलाखाली अनोळखी व्यक्तीचे तुकडे करून पोत्यात भरून टाकले होते. या प्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राजूर पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासाठी छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित केले. त्यातून खिरविरे येथील प्रदीप सुरेश भंगारे (वय 25) हा तरुण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. तरुणाच्या हातातील लाल दोऱ्यावरून भाऊ संचित सुरेश भांगरे याने तो भाऊ असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांची दुचाकी बाभूळवंडी शिवारात झाडाझुडपांत आढळली. प्रदीप आणि आजोबांमध्ये नेहमी वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी आजोबा कमलाकर डगळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुलगा हरिश्‍चंद्रची मदत घेतली, असेही सांगितले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व पिंपरी-चिंचवड क्राइम युनिटने हरिश्‍चंद्र डगळे याला ताब्यात घेतले. आरोपींना राजूर पोलिसांच्या ताब्यात दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार व कर्मचारी, राजूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

पोलिसांकडे कबुली देताना आरोपी कमलाकर डगळे म्हणाला, मृत प्रदीप सुरेश भांगरे हा नातू असून तो नेहमी दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करून त्रास देत असे. त्यावरून आमच्या वाद झाले होते. 27 जून रोजी प्रदीप भांगरे दुचाकीवर दारू पिण्यासाठी पैसे मागणे करिता आला होता. त्यावरून वाद झाल्याने कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याचे सांगितले. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुलगा हरिश्‍चंद्र डगळे याची मदत घेतल्याचे सांगितले. अहमदनगर. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com