जलक्रांतीसाठी आजींबाईंनी दिले 51 हजार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

महिनाभरापासून येथील तरुणांनी सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर केलेल्या आवाहनास गावातून व बाहेरील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कामांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. यातून गावातील तळे, केटीवेअर, ओढे यांचे खोलीकरण व रुंदीकरण झाले आहे. याचा उपयोग पाण्याची पातळी वाढविण्यासाठी निश्‍चित होणार आहे. 

टाकळी ढोकेश्वर : कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील तरुणांनी लोकसहभागातून उभ्या केलेल्या जलसंधारणाच्या कामांना आता चांगलाच वेग मिळाला आहे. सर्वच स्तरांवरून मदतीचा ओघ सुरू असताना गावातील लक्ष्मीबाई पांडुरंग ठुबे या आजींनी आपली बचत केलेली 51 हजारांची रक्कम या जलक्रांती अभियानासाठी दिली. 

महिनाभरापासून येथील तरुणांनी सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर केलेल्या आवाहनास गावातून व बाहेरील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कामांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. यातून गावातील तळे, केटीवेअर, ओढे यांचे खोलीकरण व रुंदीकरण झाले आहे. याचा उपयोग पाण्याची पातळी वाढविण्यासाठी निश्‍चित होणार आहे. 

हेही वाचा - मोठी बातमी - नगरमध्ये एकाच कुटुंबातील पाचजण बाधित

जुन्या काळात दुष्काळात गावातील तलावाची नालाबंडिंगसह इतर कामे गावातील जुन्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर केली आहेत. त्यामुळे दुष्काळ काय आहे, त्याला कशा पद्धतीने कान्हूरकर तोंड देत आहेत हे जुन्या-जाणत्या ज्येष्ठांना चांगलेच ठाऊक आहे. आज तरुणांनी जी जलसंधारणाची कामे सुरू केली आहेत, ते पाहून जुने-जाणते आनंदित झाले आहेत. या कामांमुळे थोडीफार तरी गावाच्या पाणी पातळीत वाढ होईल.

तसाच तो लक्ष्मीबाई पांडुरंग ठुबे यांनाही चांगलाच जाणवला. त्यांनी केलेली बचत म्हणजे तब्बल 51 हजार रुपयांची रक्कम जलक्रांती अभियानासाठी दिली. ही रक्कम रावसाहेब झावरे, कैलास लोंढे, धनंजय ठुबे, सूरज नवले, प्रसाद शेळके, ज्ञानदेव वाघुंडे, स्वप्नील सोमवंशी यांनी स्वीकारली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandmother gave 51 thousand for water revolution