शासकीय तूरखरेदी केंद्रास माळवाडगाव येथे प्रारंभ

गौरव साळुंके 
Tuesday, 12 January 2021

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी येथील बाजार समितीसमोरील श्रीकृष्ण हार्डवेअरशेजारील 71 क्रमांकाच्या गाळ्यामध्ये शासकीय दराने तुरीच्या विक्रीसाठी नावनोंदणी केली जाणार आहे. तसेच, येथील बेलापूर रस्त्यासमोरील यशोधन कार्यालयात शेतकऱ्यांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन आमदार कानडे यांनी केले. 

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्‍यातील माळवाडगाव येथे ग्रीन पॅक फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे, शासकीय हमीभावाने तूर खरेदी केंद्रास नुकताच प्रारंभ झाला. सरकारने तुरीसाठी सहा हजार रुपये हमीभाव जाहीर केला असून, तालुक्‍यात हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत होती. त्यामुळे माळवाडगाव येथील ग्रीन पॅक फार्मर प्रोड्युसर कंपनीने 'नाफेड'ची मान्यता घेऊन खरेदी केंद्र सुरू केल्याची माहिती ग्रीन पॅक फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रमोद आसने यांनी दिली.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी येथील बाजार समितीसमोरील श्रीकृष्ण हार्डवेअरशेजारील 71 क्रमांकाच्या गाळ्यामध्ये शासकीय दराने तुरीच्या विक्रीसाठी नावनोंदणी केली जाणार आहे. तसेच, येथील बेलापूर रस्त्यासमोरील यशोधन कार्यालयात शेतकऱ्यांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन आमदार कानडे यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शेतकऱ्यांना नावनोंदणीसाठी तूरपेरणीची नोंद असलेला सात-बारा उतारा, आधार कार्ड, बॅंक पासबुकच्या झेरॉक्‍सची प्रत जोडणे आवश्‍यक आहे. माळवाडगाव येथील ग्रीन पॅक फार्मर प्रोड्युसर कंपनीत वरील कागदपत्रे देऊन ऑनलाइन नावनोंदणी केली जाणार आहे. नोंदणीनंतर संबंधित शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज आल्यानंतर तूर माळवाडगाव येथील शासकीय खरेदी केंद्रावर आणावी लागणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी शासकीय तूर खरेदी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार कानडे आणि आसने यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green Pack Farmer Producer Company has recently started a Tur Shopping Center at Malwadgaon in Shrirampur Taluka with a government guarantee