esakal | मुख्याध्यापकांना शाळेवर थांबण्याचे शिंदे यांचे निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

Group Education Officer Nagnath Shinde has instructed the headmaster to stay at the school

तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना लेखी पत्राद्वारे शाळेवर थांबण्याचे निर्देश दिले आहेत. 

मुख्याध्यापकांना शाळेवर थांबण्याचे शिंदे यांचे निर्देश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामखेड (अहमदनगर) : कोविडचा फैलाव रोखण्यासाठी गावोगावी आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन कोरोना साखळी खंडित करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे ऍक्‍टिव्ह रोलमध्ये आले आहेत. त्यांनी तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना लेखी पत्राद्वारे शाळेवर थांबण्याचे निर्देश दिले आहेत. 

जिल्ह्यात 31 हजार नवीन वीजजोडणी कार्यान्वित

जामखेड तालुक्‍यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी तहसिलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, वैद्यकीय अधीक्षक संजय वाघ, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड हे प्रशासकीय अधिकारी तत्परतेने काम करीत असून शिक्षण विभागही यामध्ये माघे नाही.

अवैध वाळूउपसा होऊ देणार नाही : डॉ. सुजय विखे पाटील
 
गटशिक्षणाधिकारी शिंदे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना सातही दिवस मुख्यालय न सोडण्याच्या तसेच शाळेवर थांबण्याच्या लेखी सूचना देऊन कामकाजाचे स्वरूप दिले आहे. तसेच गावात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील वीस व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तपासण्यांसाठी तपासणी सेंटरला पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील लॉकडाऊनच्या काळात गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले होते. तालुक्‍यातील कोरोनाचा फैलाव वाढत असून स्थिती भयावह होऊ लागली आहे. मदतीसाठी शिक्षकांनी पुढे यावे यासाठी गटशिक्षणाधिकारी शिंदे यांनी लेखी पत्रद्वारे शिक्षकांना सूचना केल्या आहेत.
 

loading image