
राहुरी: मुसळवाडी येथे शेतातील सामायिक बांध व चारीचे पाणी घेण्याच्या वादातून दोन कुटुंबांत तुफान हाणामारी झाली. त्यात दोन्ही गटांचे एकूण तीन जण जखमी झाले. राहुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या. त्यानुसार एकूण १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.