आमदारांचा निधी रुग्णांच्या उपचारासाठी : मुश्रीफ

मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
Guardian Minister Hasan Mushrif
Guardian Minister Hasan MushrifEsakal

मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, महापालिकेचे आयुक्‍त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी, तसेच आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सद्यःस्थिती विशद केली. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जानेवारी महिन्यात घट झाली होती. फेब्रुवारी महिन्यात तीन हजार 645 रुग्ण आढळून आले होते. मात्र, मार्च महिन्यात 19 हजार, तर एप्रिल महिन्यात आज अखेर 34 हजार 335 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणारे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व ऑक्‍सिजन अपुरे पडत आहे. प्रामुख्याने रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची कमतरता असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

मुश्रीफ म्हणाले, की कोरोना संसर्गाची साखळी तुटली तरच जीव वाचणार आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील कोरोनाबाधित रुग्णांवर शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. साई रुग्णालयाचे 150 बेड कोरोनाबाधित रुग्णांसाठी, तर उर्वरित 100 बेड अन्य रुग्णांवरील उपचारांसाठी वापरले जाणार आहेत. साईनाथ रुग्णालयात 300 बेड ऑक्‍सिजन सुविधायुक्त आहेत.

महत्त्वाचे निर्णय

- जिल्ह्यात सलग चौदा दिवस जनता कर्फ्यू

- कोरोनाबाधित रुग्णांना घरी विलगीकरण कक्षात राहण्यास बंदी

- रुग्णवाहिकेचे दर ठरविले जाणार

- सलूनसह छोट्या व्यावसायिकांना विशेष पॅकेज देण्यासाठी प्रयत्नशील

- साईबाबा संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर उपचार

- सर्व अधिकाऱ्यांचे फोन 24 तास सुरू राहणार

- ग्रामसमित्यांना पूर्वीप्रमाणे काम करण्याचे अधिकार प्रदान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com