
Guardian Minister Vikhe Patil highlights Gram Panchayats’ crucial role in Maharashtra’s rural development.
Sakal
अहिल्यानगर : गावपातळीवर पाणी, रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षणाचा दर्जा उंचावणे हेच या पंचायत राज अभियानाचे उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायती लोकशाहीची पहिली पायरी आहे. त्या सक्षम झाल्या, तरच खऱ्या अर्थाने समृद्ध महाराष्ट्र घडेल. प्रत्येक गावाने आपला विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.