
अहिल्यानगर: अतिवृष्टीने निर्माण झालेल्या संकटात नागरिकांना मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या स्वरूपात पाणी आलेल्या नागरी वस्त्यामधील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित कराव्यात, अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.