"Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil calls for unified government action to support flood-hit farmers."
Sakal
अहिल्यानगर
Radhakrishna Vikhe Patil: शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र काम करावे : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील;'पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान'
Maharashtra Farmers Suffer Major Losses: पालकमंत्री विखे पाटील यांनी आज पाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव, चांदगावरोड, कारेगाव येथील नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर मोहटे गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. गडावर अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
पाथर्डी: मागील ५०-६० वर्षांत झाला नाही एवढा मोठा पाऊस चालू वर्षी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाथर्डी-शेवगाव तालुक्यांत एक लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नालाबंडिंग, पाझरतलाव, बंधारे, रस्ते, पूल यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाचा सर्व खात्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

