जामखेडच्या धान्य दुकानातील तांदळाचे गुजरात कनेक्शन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

चौंडी - चापडगाव शिवारात रवाना झाले. सदर ठिकाणी सापळा लावून चौंडीकडून येणाऱ्या संशयित ट्रक थांबवून त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत सदरच्या ट्रकमधील असणारा तांदूळ अंदाजे वजन 24 तर हा मंदा सुग्रीव वायकर (रा. सोनेगाव ता. जामखेड जि:नगर यांच्या स्वस्त धान्य दुकानातून आणला असल्याचे निष्पन्न झाले.

नगर : कोरोना संक्रमणाच्या काळात जामखेड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ थेट गुजरातला काळ्याबाजारात विक्रीला निघाला आहे. याची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या विशेष पथकाने ट्रकसह तांदूळ व चालक, सहचालकास ताब्यात घेऊन गजाआड केले. गुरुवारी (ता. 28 )रोजी चौंडी-चापडगावच्या शिवारात हा ट्रक पकडला . संबंधित स्वस्त धान्य दुकानदार विरुद्ध कायदेशीर कारवाई केली.

या संदर्भात अधिक माहिती अशी; जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून अवैधरित्या तांदळाने भरलेला ट्रक सोनेगावहून नान्नज, चौंडी-चापडगाव मार्गे गुजरात येथे काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी चालविला आहे.
 अशी माहिती खबर्याकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल भरत गडकर,
 केशव सरकटे, आप्पासाहेब कोळेकर, संतोष साबळे, उदय घोडके, आदित्य बेलेकर, सागर जंगम, लहू खरात यांचा समावेश असलेल्या पथकाला मिळाली.

हेही वाचा - त्या जुळ्यांसाठी कोण गाईल अंगाई...काल जन्म दिला आज कोरोनाने नेली आई

हे पथक चौंडी - चापडगाव शिवारात रवाना झाले. सदर ठिकाणी सापळा लावून चौंडीकडून येणाऱ्या संशयित ट्रक थांबवून त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत सदरच्या ट्रकमधील असणारा तांदूळ अंदाजे वजन 24 तर हा 
मंदा सुग्रीव वायकर (रा. सोनेगाव ता. जामखेड जि:नगर यांच्या स्वस्त धान्य दुकानातून आणला असल्याचे निष्पन्न झाले.

सदर बाबत महसूल प्रशासन जामखेड यांच्यावतीने स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली असता नमूद तांदूळ हा त्या दुकानातून आणला असल्याचे दिसून आले. महसूल प्रशासनाला सदर ठिकाणी नोंदीमध्ये देखील अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या बाबतची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन महसूल प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

या संक्रमण काळात जामखेड तालुक्यातून गुजरातला काळ्याबाजारात रेशनिंगचा तांदूळ विक्रीकरिता जाणारा ट्रक (एमएच 45 टी 73 96) हा अंदाजे वजन 24 टन तांदूळ सहचालक शशिकांत भीमराव गवळी (रा. कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर) सहचालक संदीप सुनील लोंढे (रा: बारलोणी, ता: माढा जि: सोलापूर) त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. संबंधितांना जामखेड पोलिस निरीक्षक यांच्या ताब्यात दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat connection of rice in Jamkhed grain shop