esakal | गुटख्याची तस्करी करणारे मुद्देमालासह जेरबंद; लाखोंचा गुटखा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

gutka smuggllers arrested by ahmednagar police

गुटख्याची तस्करी करणारे मुद्देमालासह जेरबंद; लाखोंचा गुटखा जप्त

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदनगर : महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटखा, तंबाखूची तस्करी करणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून वाहनांसह 15 लाख 62 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे.

गोपनिय माहितीतू्न रचला पोलिसांनी सापळा

स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली. अशोक लेलॅंड टेम्पो (MH-16-CC-4920) व टेम्पो (MH-16-CC-3621) या दोन वाहनांमधून काही व्यक्‍ती हे दौंड ते अहमदनगर महामार्गाने राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा विक्री करण्यासाठी नगर शहराच्या दिशेने येत आहेत. नगर-दौड रस्त्यावरील अरणगाव चौक या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी एकाच वेळी रस्त्यावर येऊन दोन्ही टेम्पो चालकांना त्यांचे टेम्पो थांबविण्याचा इशारा केला. दोन्ही टेम्पोंची पंचासमक्ष झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला हिरा कंपनीचा गुटखा तसेच रॉयल 717 कंपनीची तंबाखू व दोन टेम्पो असा एकूण 15 लाख 62 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

हेही वाचा: 70 हजारांची नोकरी सोडून बनला शेतकरी, आता महिन्याला कमावतो 9 लाख!

शेख नासिर अहमद चाँदमिया (वय 44, रा. गाडेकर गल्ली, भिंगार) टेम्पो नं. एमएच 16 सीसी 4920 वरील चालक, शेख अय्याज नसीर ( वय 39, रा. मोमिन गल्ली, भिंगार), आबेद नासिर शेख, (वय 34, रा. नागरदेवळा, ता. नगर), टेम्पो नं. एमएच-16 सीसी 3621 वरील चालक, सय्यद असिफ महेमूद (वय 42, रा. मोमिनगल्ली, भिंगार) असे पकडण्यात असलेल्या आरोपींची नावे आहेत.

दोन्ही वाहने शेख नूर अब्दुल रऊफ, (रा. मोमिन गल्ली, भिंगार) याच्या मालकीचे असल्याचे सांगितले. त्यामधील माल हा सादिक खान इमाम पठाण (रा. नेवासा) याचे मालकीचा असल्याचे सांगितले. त्यावरुन आरोपींचा शोध घेऊन आरोपी सादिक खान (वय 48, रा. नाईकवाडपुरा गल्ली, नेवासे) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.

पोलिस कॉन्स्टेबल कमलेश हरिदास पाथरुट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात धुमाकुळ घालणारे सराईत अखेर गजाआड

loading image
go to top