
याबाबत पोलिस नाईक प्रदीप साठे यांनी आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, आश्वी बुद्रुक येथील हमीद उमराव शेख (वय 38, रा. मोमीनपुरा) यांच्या घरात मानवी आरोग्याला घातक पदार्थ साठविल्याची माहिती मिळाली होती.
संगमनेर (अहमदनगर) : उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व आश्वी पोलिस ठाण्याने बुधवारी आश्वी बुद्रुकमधील मोमीनपुरा प्रभागातून 62 हजार 400 रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली. याप्रकरणी एकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे ही वाचा : विभागीय आयुक्त नगर जिल्हा परिषदेवर खुश
याबाबत पोलिस नाईक प्रदीप साठे यांनी आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, आश्वी बुद्रुक येथील हमीद उमराव शेख (वय 38, रा. मोमीनपुरा) यांच्या घरात मानवी आरोग्याला घातक पदार्थ साठविल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस नाईक शांताराम मालुंजकर, अनिल कडलग, पोलिस कॉन्स्टेबल बापूसाहेब हांडे, आश्वी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नयन पाटील, महिला पोलिस नाईक ज्योती दिघे आदींनी छापा घातला.
हे ही वाचा : निघोज ग्रामपंचायतीत महिलाच करणार प्रस्तापितांविरोधात पॅनल
या वेळी सुमारे 62 हजार 400 रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू व गुटखा लपविलेला आढळला. हा गुटखा निमगाव जाळी येथील संतोष डेंगळे यांच्या मालकीचा असल्याचे व तो आश्वी परिसरात विक्रीसाठी दिल्याचे शेखने सांगितले. अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अन्न व औषध प्रशासन कार्यालय कारवाई करणार आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले