esakal | गुड न्यूज! नगर जिल्ह्यातील धरण भरले; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

Happiness among farmers due to filling of black dam in Nagar district

ढवळपुरी व भाळवणी परिसराला वरदान असणारे काळू धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुड न्यूज! नगर जिल्ह्यातील धरण भरले; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

sakal_logo
By
केशव चेमटे

भाळवणी (अहमदनगर) : ढवळपुरी व भाळवणी परिसराला वरदान असणारे काळू धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

काळू धरणाची साठवण क्षमता 299 दशलक्ष घनफुट आहे. या धरणातून ढवळपुरी, भाळवणीसह परिसरातील वाडया वस्त्यांसह अनेक गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने अजून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. आनेक शेतकरी व पाणीवाटप संस्थानी जलवाहिन्या टाकून शेतीसाठी पाणी उचलले आहे.

धरण भरल्याने खरीप हंगामासह रब्बी हंगामातील ज्वारी, कांदा, गहू, हरबरा, वाटाणा, टोमँटो आदी पिके शाश्वत झाली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी 2011 व 2017 मध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी फळबागा जोपासल्या आहेत.

धबधबा पर्यटकांचे आकर्षण
धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नदीपात्रातून पाणी वहात आहे. धरणाच्या खालच्या बाजुला धबधबा फेसाळत आहे. हा धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण बनले असून हौशी पर्यटक भेट देत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image