
राहुरी : दूध डेअरी चालू करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.