Ahmednagar Zilla Parishad
Ahmednagar Zilla Parishadsakal

अहमदनगर झेडपीच्या वास्तूला गतवैभव प्राप्त होणार...

पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे प्रयत्न : जिल्हा नियोजनमधून निधीची मागणी

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता प्रशासनाला पाच कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. हा निधी जिल्हा नियोजनमधून मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्या प्रयत्नाला यश येईल, अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.

बडोदा संस्थानातील कर्तृत्ववान संस्थानिक, पुरोगामी विचारांचे कल्याणकारी राजे श्रीमंतराजे सयाजीराव खंडेराव गायकवाड यांनी स्वखर्चातून लोकल बोर्डसाठी इमारत बांधून दिली होती. लोकल बोर्डानंतर जिल्हा परिषद अस्तित्वात आली. या ऐतिहासिक वास्तूत अनेक जिल्ह्यासाठी विधायक निर्णय झाले असून, या वास्तूत बसलेल्या काही नेत्यांनी राज्यात नेतृत्व केले आहे. अशा या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सुमारे पाच कोटी रुपयांची या कामासाठी मागणी करण्यात आलेली आहे. हा निधी जिल्हा नियोजनमधून द्यावा, अशी आग्रही मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.

अपेक्षित खर्च व होणारी कामे

  • एक कोटी : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या धर्तीवर विद्युतीकरण.

  • ५० लाख : विशेष बैठकींसाठी पहिल्या मजल्यावर हॉल सुशोभीकरण

  • अडीच कोटी ः आवश्‍यक त्या दुरुस्त्या व चाचण्या करून कौन्सिल हॉल पुणे सारखे काम.

  • २५ लाख ः समृद्ध वास्तुरूपी वारशाचे प्रदर्शन

  • ५० लाख ः इमारतीत पहिल्या मजल्यावर फरशी व आभासी छत बदलून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची कार्यालये.

  • २५ लाख ः भोवतालच्या जमिनीची पातळी खाली घेऊन सुशोभीकरण

४८ लाखांचे काम थांबविले

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या डागडुजी व दुरुस्तीसाठी एकूण ४८ लाखांचा निधी मंजूर आहे. ते काम करण्यासाठी टेंडर मंजूर झालेले आहे. मात्र प्रत्यक्षात काम मंजूर झालेले नाही. या पाच कोटींचा निधी जर मंजूर झाला, तर ते ४८ लाख त्यामध्ये समाविष्ट करून काम करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याचे समजते.

जिल्हा परिषदेच्या जुन्या वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या वास्तूच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. हे काम व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर प्रयत्नशील आहेत.

-संभाजी लांगोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या जुन्या वास्तूला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहोत. जिल्हा नियोजन मंडळाकडे पाच कोटींच्या निधीची मागणी केलेली आहे. तसेच निवेदनही पालकमंत्र्यांनाही देण्यात आलेले आहे. जुन्या वास्तूतीली पहिल्या मजल्यावरचा हॉल सुशोभीकरण, जिल्ह्यातील समृद्ध वास्तूरूपी वारशाचे प्रदर्शनासह विविध कामे या पाच कोटी निधीतून करण्यात येणार आहेत.

- राजश्री घुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com