

Father Breaks Down After Son’s Question on Exam vs. Wedding Pressure
Sakal
शिर्डी : ‘तुम्हाला माझी परीक्षा नाही तर लग्नाला हजर राहणे महत्वाचे वाटते का ? माझी परीक्षा हुकली तर मी काय करू ते सांगा ? हे प्रश्न मुलाने मोबाईलवरून विचारल्यामुळे वडील अक्षरशः हादरून गेले. नगर- कोपरगाव महामार्गावरील वाहतूक कोंडीत सापडलेल्या मुलाला आपण काहीच मदत करू शकत नाही, या भावनेने वडीलांच्या डोळ्यात मात्र अश्रू तराळले.