
“Students of Jalshuddhikaran School, Vildam donate their snack money to Sakal Relief Fund, setting an inspiring example of compassion.”
Sakal
अहिल्यानगर: पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी जमा करण्याचा मनोदय शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केला. तेव्हा मुले, पालकही त्यामध्ये सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाऊचे पैसे दिले. काही मुलांनी तर आपली छोटीशी ‘मनी बॅंक’ फोडून त्यातील निधी दिला. शिक्षकांनीही आपल्या पगारातील रक्कम त्यामध्ये टाकून निधी सकाळ रिलिफ फंडासाठी देऊन एक आदर्श निर्माण केला.