

Rain-damaged paddy field in Akole taluka; farmers demand compensation for heavy crop loss.
Sakal
अकोले: अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भात काढणीला सुरुवात झाली असताना गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात पिकांचे नुकसान झाले आहे. आधीच रोगांचा प्रादुर्भाव व आता पावसाच्या तडाख्याने भात पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त भात पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.