
Shambhuraj Desai Visits Ahilyanagar Post-Heavy Rain, Interacts with Farmers
Sakal
राशीन: राज्यासह जिल्ह्यात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाचे गांभीर्य राज्य सरकारने घेतले असून, सर्व मंत्री जनतेत जाऊन परीस्थिती जाणून घेत आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे आणि वाहून गेलेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करा, जे रस्ते नियोजनात नाहीत. मात्र, लोकांच्या दळणवळणासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी पूल द्या, अशा सूचना प्रशासनास देत पर्यटनमंत्री शंभुराज देसाई व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चिलवडी, होलेवाडी (ता. कर्जत) येथील नुकसानीची आज (ता.२४) पाहणी केली.