esakal | भंडारदरा पाणलोटात धुवाधार पाऊस; कोथळे धरण ‘ओव्हर-फ्लो’
sakal

बोलून बातमी शोधा

Bhandardara Dam

भंडारदरा पाणलोटात धुवाधार पाऊस; कोथळे धरण ‘ओव्हर-फ्लो’

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अकोले (जि. नगर) : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटघर व रतनवाडीत जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. आज (बुधवारी) सकाळपर्यंत चोवीस तासांत रतनवाडी येथे साडेसहा व घाटघर येथे पाच इंच पाऊस झाला. त्यामुळे धरणात ४२९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. भंडारदरा धरण ५२ टक्के, तर कोथळा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. वादळाने आदिवासींच्या घरांवरील पत्रे, कौले उडाली. विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. (Heavy rainfall in the catchment area of ​​Bhandardara Dam)

भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने डोंगरांवरून धबधबे कोसळू लागले आहेत. काही ठिकाणी भातआवणीच्या कामांना वेग आला आहे. कृष्णावंती नदीला पूर आला असून, वाकी प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे. रंधा धबधबा कोसळू लागला असून, कोदणी वीजप्रकल्पही सुरू झाला आहे. सायंकाळी भंडारदरा धरणाचा साठा पाच हजार ५९० दशलक्ष घनफूट झाला होता. दरम्यान, मुळा पाणलोटात हरिश्चंद्रगड, आंबीत, पाचनई, कुमशेत परिसरात संततधार सुरू आहे. आंबीत, पिंपळगाव खांडपाठोपाठ कोथळे धरण ‘ओव्हर-फ्लो’ झाले आहे. मुळा नदीतून सकाळी पाच हजार ४४९ क्यूसेक वेगाने पाणी वाहत होते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: नाशिक : कारवर झाड कोसळून तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू!

चोवीस तासांत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

भंडारदरा- ११७, घाटघर १२५, रतनवाडी- १५५, पांजरे- १२२, निळवंडे- ९५, आढळा- ११, अकोले- ३, कोतूळ- १४,

धरणांतील पाणीसाठा (आकडे दशलक्ष घनफूट)

भंडारदरा- ५७९६, निळवंडे- १६००, आढळा- ४७९, वाकी- ७८.३६.

हेही वाचा: मुळा धरणात ४० टक्के पाणीसाठा; यंदा धरण भरणे शक्य

loading image