esakal | मुळा धरणात ४० टक्के पाणीसाठा; यंदा धरण भरणे शक्य
sakal

बोलून बातमी शोधा

Mula-Dam

मुळा धरणात ४० टक्के पाणीसाठा; यंदा धरण भरणे शक्य

sakal_logo
By
टीम-ईसकाळ


राहुरी (जि. नगर) : मुळा धरणात आज (बुधवारी) ४० टक्के पाणीसाठा झाला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात एक टीएमसी पाणी जास्त आहे. धरणाच्या पाणलोटात अद्याप दमदार पाऊस सुरू झालेला नसला, तरी यंदा धरण भरणे शक्य आहे. हरिश्चंद्रगडावर रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे लहीत खुर्द (कोतूळ) येथे आज दुपारी बारा वाजता मुळा नदीपात्रातून पाच हजार ६०० क्यूसेकने धरणात पाण्याची आवक सुरू होती. (Mula dam has 40 percent water storage today)


मुळा धरणात आज सकाळी सहा वाजता १० हजार ५४१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला. काल (मंगळवारी) दिवसभरात कोतूळ येथे सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हरिश्चंद्रगड व कोकणकड्यावर रिमझिम पाऊस असल्याने, सकाळी सहा वाजता पाच हजार ८२६ क्यूसेक, तर दुपारी बारा वाजता पाच हजार ६०० क्यूसेकने धरणात पाण्याची आवक सुरू होती. २५ जुलैनंतर धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू होतो, असा यापूर्वीचा अनुभव आहे.
धरणाच्या पाणलोटातील आंबीत, बलठण, पिंपळगाव खांड व इतर सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे, यापुढे पाणलोटात होणाऱ्या पावसाचे सर्व पाणी थेट मुळा धरणात येणार आहे.

हेही वाचा: नाशिक : कारवर झाड कोसळून तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू!


२१ जुलैचा मुळा धरणसाठा (दशलक्ष घनफूट)
क्षमता : २६,०००
मागील वर्षी : ९,४०५
या वर्षी : १०,५४१

(Mula dam has 40 percent water storage today)

हेही वाचा: Redmi चा पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

loading image