
Heavy monsoon rains flood Ahilyanagar and surrounding villages; crops and cattle suffer severe losses.
Sakal
-प्रकाश पाटील
महाराष्ट्रातील बळीराजा पुन्हा एकदा अस्मानी संकटांचा सामना करीत आहे. पावसाने अवघ्या संसाराचाच राडा झाला. मराठवाडा आणि अहिल्यानगरसह तीस जिल्ह्यांत अतिवृष्टीने पन्नास लाख हेक्टरवरचे नुकसान झाले. त्यापैकी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. हानी भरून न येणारी आहे. दोन हजार दोनशे कोटी सरकारने मंजूर केले. कधीही अनुभवला नाही, असा पाऊस लोकांनी पाहिला. पशुधनाबरोबरच घरांची पडझड झाली आहे. जिरायती आणि बागायती शेती उद्ध्वस्त झाली. जीवित हानीही झाली.