कोरोना तिसरी लाट; नगर जिल्ह्यात आढळले उच्चांकी रुग्ण

corona third wave
corona third waveesakal

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे (coronavirus) अलीकडच्या काळातील उच्चांकी १२२४ रुग्ण बुधवारी आढळून आले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा एक प्रकारे हा बिगुल आहे. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या दोन लाख ९६ हजार ३२२ झाली आहे. दिवसभरात तेरा रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सहा हजार १५२ रुग्णांना प्राणास मुकावे लागले आहे. विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, लग्न, दशक्रिया विधी अशा प्रसंगी होणारी मोठी गर्दी, ही कोरोना संसर्गवाढीची कारणे ठरत आहेत.(highest-number-of-patients-found-due-third-wave-of-corona-jpd93)

कोरोनाचा पुन्हा उद्रेक

संगमनेर तालुक्‍यात बुधवारी उच्चांकी २९१ रुग्ण आढळून आले. जिल्ह्याच्या दक्षिणेतील तालुक्‍यांत कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. पारनेरमध्ये १६६ रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल कर्जतमध्ये ९६, जामखेडमध्ये ९४ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्येत हे तालुके अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आले आहेत. नगर तालुक्‍यात ८५ रुग्ण वाढले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १२९, खासगी प्रयोगशाळांत ६५७, तर रॅपिड अँटिजेन चाचणीत ४३८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या दोन लाख ९६ हजार ३२२ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढण्यास सुरवात झाली आहे. दिवसभरात तेरा रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत सहा हजार १५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या ५९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत दोन लाख ८४ हजार ७४८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या पाच हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे ः संगमनेर २९१, पारनेर १६६, कर्जत ९६, श्रीगोंदे ६८, पाथर्डी ५५, जामखेड ९४, शेवगाव ४२, नगर तालुका ८५, नेवासे ५२, कोपरगाव ३६, श्रीरामपूर ४२, राहाता ५५, राहुरी ६४, अकोले ४०, नगर शहर २४, भिंगार दोन रुग्ण. परजिल्ह्यांतील बारा रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.

corona third wave
तहसीलदार पवारांच्या बदलीपूर्वीच नव्या नावाची चर्चा!
corona third wave
पत्नीची सासरच्यांना बेदम मारहाण; 6 जणांविरोधात गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com