
-मार्तंड बुचुडे
पारनेर: अहिल्यानगर -पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांस दमबाजी मारहाण करत कोयता व सत्तूरचा धाक दाखवून लुटमार करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत झाली आहे. २५ ऑगस्ट रोजी पहाटे एका ट्रकचालकाला दोन दुचाकीवरून आलेल्या पाच भामट्यांनी लोखंडी सत्तूरचा धाक दाखवून लुटल्याची घटना सुपे टोलनाक्याच्या पुढे म्हसणे फाटा येथे घडली. याबाबत प्रदीप बिभीषण तिडके (वय ३२, रा.संगम ता. धारूर, जि.बीड, हल्ली रा. चाकण, पुणे) यांनी सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.