

Highway Repairs Repeated Thrice in Three Years: ₹15 Crore Gone on Ahmednagar–Sambhajinagar Stretch
Sakal
-समीर दाणी
अहिल्यानगर: अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम ऑक्टोबर अखेरपासून सुरु करण्यात आले आहे. नगर ते वडाळा या ४२ किलोमीटर अंतरावरील पॅचिंगचे काम पुढील आठ ते दहा दिवसात पॅचिंगचे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. यासाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या महामार्गावर तीन वर्षांत तीन वेळा पॅचिंग करण्यात आले. यासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.