Highway Traffic Jam: ट्रकने महामार्ग रोखला; प्रवाशांचे हाल! महामार्गाचे चौपदरीकरण झाले, तरी वाहतूक कोंडीचा फास कायम

Highway Widening Fails to End Traffic Jams for Commuters: महामार्गावर ट्रक आडवा अन् प्रवासी तासन्‌तास अडकले; चौपदरीकरणाचा उपयोग काय?
Truck Blocks Highway Triggering Massive Traffic Jam Despite Four Lane Road Expansion Commuters Face Long Delays

Truck Blocks Highway Triggering Massive Traffic Jam Despite Four Lane Road Expansion Commuters Face Long Delays

sakal

Updated on: 

-राजू नरवडे

संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर प्रवास वेगवान आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, चंदनापुरी घाटातील एका अपघाताने या अपेक्षांना हरताळ फासला. शनिवारी (ता. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मालवाहू ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने सात ते आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला. या घटनेमुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक तब्बल पाच ते सहा तास ठप्प झाली. हजारो वाहने रस्त्यावर अडकून पडली. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अखेर मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.

Loading content, please wait...