

Hindutva organisation activists stage hunger strike
Sakal
पाथर्डी: राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही तालुक्यातील तिसगाव येथे राजरोजपणे गोवंशाची हत्या करून मांसाची तस्करी सुरू आहे. प्रशासनाकडून केवळ जुजबी कारवाई केली जात आहे. त्यामुळे तिसगाव येथील कत्तलखाने तातडीने उद्ध्वस्त करा, या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील संत-महंतांनी व हिंदुत्ववादी संघटनांनाच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले.