esakal | शेवगावात कृषी विधेयकाची केली होळी
sakal

बोलून बातमी शोधा

शेवगावात कृषी विधेयकाची केली होळी

भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगरे, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापुराव राशिनकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

शेवगावात कृषी विधेयकाची केली होळी

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव : केंद्र सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी विधेयक शेतकरी विरोधी असून या कायद्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आरपीआय व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शहरातील क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करीत कृषी विधेयकांची होळी केली. 

भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगरे, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापुराव राशिनकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

नांगरे म्हणाले की, या तिन्ही कृषी विधेयकांमुळे पिकांची हमीभावाने होणारी सरकारी खरेदी पूर्णपणे बंद होवून खासगी बाजार स्थापन होतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही. तसेच सर्व जीवनावश्‍यक वस्तूंच्या किंमती वाढतील.

भाजपच्या काळात शेतकरी अधिक कर्जबाजारी झाले आहेत. सरकार वीज, डिझेल आदींच्या किंमती वाढवत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा वेगही झपाट्याने वाढणार आहे. 
दत्तात्रेय फुंदे यांनी मनोगत व्यक्‍त केले.

भाकपचे तालुका सचिव भगवान गायकवाड, छबूराव मंडलिक, प्रेम अंधारे, मुरलीधर काळे, कुंडलीक काळे, शंकर देवढे, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, भाऊ बैरागी, अमोल देवढे, आरपीआयचे सुनिल आहुजा, गोरक्ष काकडे, दादासाहेब पाचरणे, प्रशांत घुमरे, संदिप मगर उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर