महापालिकेची पुन्हा चूल पेटली !

Municipal Corporation's chool ignited again
Municipal Corporation's chool ignited again

नगर : कडक लॉकडाउनच्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन, लोकसहभागातून शहरात "कम्युनिटी किचन' संकल्पना राबविली. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर "कम्युनिटी किचन' बंद करण्यात आले; मात्र आता शहरात कंटेन्मेंट झोन वाढू लागल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी लोकसहभागातून पुन्हा "कम्युनिटी किचन' सुरू केल्याची माहिती महापालिकेचे यंत्र अभियंता परिमल निकम यांनी दिली. 

सिद्धार्थनगर, तोफखाना, नालेगाव, दिल्ली गेट, अडते बाजार, पद्मानगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने हे भाग कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. येथील नागरिकांचे हातावर पोट आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमधील गरजूंसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी लोकसहभागातून "कम्युनिटी किचन' सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कालपासून (बुधवार) संजोग हॉटेलमध्ये हे "कम्युनिटी किचन' सुरू करण्यात आले. 

संजोग हॉटेलचे संचालक प्रदीप पंजाबी यांनी त्यासाठी हॉटेल मोफत उपलब्ध करून दिले. "कम्युनिटी किचन'मधून रोज दुपारी बारा वाजता महापालिकेचे पथक गरजूंसाठी जेवणाची पाकिटे घेते आणि शहरातील कंटेन्मेंट झोनमधील गरजूंना त्यांचे वाटप मोफत केले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com