Ahilyanagar Shock: Saree Pulled Into Tractor Mechanism, Woman Loses Life
Sakal
अहिल्यानगर
दुर्दैवी घटना ! 'अहिल्यानगर ट्रॅक्टरमध्ये साडी अडकून महिलेचा मृत्यू'; वीटभट्टीवर चिखल करताना नेमकं काय घडलं..
Ahilyanagar accident: महिलेचा जागीच मृत्यू झाला. साथीदार कामगारांनी आरडाओरड करत ट्रॅक्टर बंद केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे वीटभट्टी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी जागेवर पोहोचून पाहणी केली असून पंचनामा करण्यात आला आहे.
अहिल्यानगर : वीटभट्टीवर चिखल करत असताना चिखल मिक्सर मशिनला जोडलेल्या ट्रॅक्टरच्या शाफ्टमध्ये साडीचा पदर अडकून कामगार महिलेचा मृत्यू झाला. पिंपळगाव लांडगा (ता. नगर) येथे सोमवारी (ता. १) दुपारी ही घटना घडली. माया बिडीप्रसाद चक्रवर्ती (वय ३५, मूळ रा. मध्यप्रदेश, हल्ली रा. पिंपळगाव लांडगा, ता. नगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

