अहमदनगर | शिक्षकाकडून रुग्णालयात परिचारिकेचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar

अहमदनगर : शिक्षकाकडून रुग्णालयात परिचारिकेचा विनयभंग

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (जि. अहमदनगर) : तू दुसऱ्याच्या वाहनावरून रुग्णालात का येते, मी तुला घरी सोडतो, असे म्हणत शिक्षकाने एका महिला आरोग्य कर्मचाऱ्यास मिठी मारत तिचा विनयभंग केला. या शिक्षकापासून बचाव करण्यासाठी महिला आरोग्य कर्मचाऱ्याने रुग्णालयाच्या एका खोलीत स्वतःस कोंडून घेतले.

परिचारिकेने स्वतःला एका रूममध्ये स्वतःला कोंडून घेतले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडिता राजूर येथील एका रुग्णालयात काम करते. वाहन नसल्यामुळे मिळेल त्या वाहनाने प्रवास करून ही महिला आरोग्य कर्मचारी राजूर येथे येते. दरम्यानच्या काळात आरोपी पीडितेस आपल्या वाहनावरून येण्याची विचारणा करत. मात्र तिने त्यास वारंवार नकार दिला होता. शनिवारी धिंदळे याने मित्राला सोबत घेत दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रुग्णालय गाठले. तसेच पीडितेस माझ्या वाहनावरून रुग्णालयात का येत नाहीस, असे विचारत तिला मिठी मारली. त्यानंतर घाबरलेल्या महिला आरोग्य कर्मचाने स्वतः एका रूममध्ये स्वतःला कोंडून घेतले. तसेच पोलिसांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात येत संतोष धिंदळे व अनिल पोपेरे यांना ताब्यात घेतले. पीडितेच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.

हेही वाचा: शिर्डी : सुकलेल्या फुलाने राहीबाईंचा सत्कार

दोघांवर गुन्हा; आरोपीस अटक
तसेच पोलिसांना बोलावून घेतले. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून शिक्षक व त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. १३) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. महिला आरोग्य कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिस ठाण्यात शिक्षक संतोष भाऊराव धिंदळे (रा. केळुंगण, ता. अकोले) व अनिल भरत पोपेरे (रा. कोंभाळणे, ता. अकोले) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली

हेही वाचा: थोरात कारखान्याचे काम दिशादर्शक ; गायकवाड

loading image
go to top